Latest Marathi News
Ganesh J GIF

“सातवीला तू अशी दिसत नव्हतीस..’ ; इगतपुरीत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

नाशिकमधून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इगतपुरी इथं एका नामांकित शिक्षण संस्थेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरीमधील टाकेद इथं एका इंग्रजी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. अर्जुन गबाजी हरिश्चंद्रे असं नराधम शिक्षकाचं नाव आहे.

या विकृताला घोटी पोलिसांनी अटक केली आहे. १४ वर्षीय पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं माहित असताना आरोपीने अर्जून हरिश्चंद्रे याने पीडित मुलीला उपमुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी तू सातवीला असताना एवढी नव्हती दिसत आता आठवीला आल्यावर अशी दिसतेय. असं म्हणत अंगलट करण्याचा प्रयत्न केला.

शिक्षक असा वागल्यामुळे पीडित मुलीला मानसिक धक्का बसला. तिने आपल्या पालकांकडे याची सगळी हकीकत सांगितलं. त्यानंतर पालकांनी शाळेत येऊन शिक्षकाला जाब विचारला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पालकांनी घोटी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे शिक्षकावर विनयभंगासह पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला अटकही करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शाळा प्रशासनावर दबाव वाढला आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!