Latest Marathi News
Ganesh J GIF

घाटात गाड्यांच्या रांगा,गाड्या बंद, ट्रॅफिक जॅम…; मिसिंग लिंकच्या पहिल्याच अनुभवानं मनसे नेता वैतागला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन झाले असले, तरी प्रवाशांचा मनस्ताप अद्याप संपलेला नाही. तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका अद्याप बंद ठेवण्यात आल्याने शनिवारी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. याच वाहतूक कोंडीचा फटका मनसे नेते अभिजीत पानसे यांना बसला.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रदिनी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, पुण्याहून मुंबईच्या दिशेला जाणारी लेन सुरक्षेच्या कारणास्तव अद्याप खुली करण्यात आलेली नाही. परिणामी, जुन्या घाटातूनच सर्व वाहतूक वळवण्यात आली आहे. विकेंडची गर्दी आणि एका बाजूची मार्गिका बंद असल्याने प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

https://www.facebook.com/search/top?q=abhijit%20panse

मनसे नेते अभिजीत पानसे यांनाही आज या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. खंडाळा घाटात तब्बल ३० ते ४० मिनिटे अडकून पडल्यानंतर त्यांनी आपला संताप समाज माध्यमांवर व्यक्त केला. पानसे यांनी घाटातील वाहतूक कोंडीचा व्हिडिओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला. ‘मिसिंग लिंक इज मिसिंग’ असे म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावून आपला संताप व्यक्त केला. कालच प्रकल्पाचे उद्घाटन झाले, पण आज मुंबईकडे येताना प्रचंड वाहतूक कोंडी आहे. मिसिंग लिंक नेमकी कुठे आहे? ती शोधण्यासाठी पोलिसात तक्रार द्यावी लागेल,” असा टोला त्यांनी लगावला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!