Latest Marathi News
Ganesh J GIF

मोरीत जाऊन लपला, कोयत्याचा धाक दाखवून…;भीमराव कांबळेचा नवा कारनामा समोर

पुण्यातील नसरापूरमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सातेतीन वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच आरोपी नराधम भीमराव कांबळेचे काळे कारनामे समोर आले आहेत. नराधम कांबळेवर 1998 मध्ये पहिला गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यावेळी त्याची सुटका करण्यात आली होती. अशातच पहिल्या केसमधील कांबळेविरुद्ध जबाब देणाऱ्या व्यक्तीने धक्कादायक खुलासा केला आहे.

मी भीमराव कांबळेच्या पहिल्या केसमध्ये साक्षीदार होतो. मी त्यावेळी कामाला गेलो होतो. रात्री साडेनऊ दहाच्या आसपास मी घरी आलो. त्यावेळी म्हातारी कशाला तरी बाहेर गेली होती. त्याचा फायदा घेऊन हा कांबळे मोरीत जाऊन लपला. तिथं तो दबा धरून बसला. सगळी वस्ती सामसूम झाल्यानंतर नराधमाने डाव साधला अन् कोयत्याचा धाक दाखवून त्याने त्या म्हातारीवर अत्याचार केला. रात्रीच्या दोन वाजता ही घटना घडली होती, असं कोर्टातील साक्षीदारने सांगितलं.

म्हातारीचे नको नको ते हाल केले. ती म्हातारी व्यक्ती लाजेच्या शर्मेने आम्हाला काहीच बोलली नाही अन् ती तिच्या लेकीकडे निघून गेली. तिच्या जावयाने हे प्रकरण हाताशी घेतलं अन् पोलिसात गुन्हा नोंदवला होता, असं कोर्टातील साक्षीदारने म्हटलं आहे. एका मुक्त पत्रकाराला मुलाखत देताना भीमराव कांबळेच्या पहिल्या केसमध्ये साक्षीदाराने अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला आहे.

म्हातारीच्या जावयाने गावात त्याला हकलून लावायचा प्रस्ताव देखील ठेवला होता. कोयत्याचा धाक दाखवून त्याने हे कृत्य केलं. त्याला त्याचा आत्मा शांत करायचा होता. त्यामुळे त्याने असं कार्य केलं.आजीचं वय त्यावेळी 60 – 65 वर्ष होतं, असंही कोर्टातील साक्षीदारने यावेळी सांगितलं. पोलिसांना कोर्टात ठोस पुरावे सादर न करता आल्याने त्याची त्यावेळी सुटका झाली होती, असंही माहिती देखील गावकऱ्यांनी यावेळी दिली.

नसरापूर प्रकरणाची बाल हक्क आयोगाने दखल घेतली असून आरोपीला कमीत कमी दिवसात मृत्यू दंडाच्या शिक्षेची शिफारस करणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलंय. बाल हक्क आयोग स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!