
“सलमान खानच्या आयुष्यात मोठी पोकळी! रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळच्या माणसाचा अंत; ‘ती’ इमोशनल पोस्ट वाचून चाहतेही हळहळले.”
मोठ्या पडद्यावर दमदार आणि धडाकेबाज भूमिका साकारणारा अभिनेता सलमान खान खऱ्या आयुष्यात अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जिवलग मित्राच्या निधनाने तो पूर्णपणे खचला आहे. या मित्राबद्दल त्याने सोशल मीडियावरून फोटो शेअर भावनिक पोस्ट लिहिली आहे.

सलमान खानचा जवळचा मित्र शशी कुमारचे निधन झाले असून यामुळे तो अत्यंत व्यथित झाला आहे. तब्बल ४२ वर्षांची मैत्री असलेल्या या मित्राला तो ‘भाऊ’ मानत होता. मात्र, त्याच्या अकाली एक्सिटने त्याला मोठा धक्का बसला आहे. रविवारी रात्री सलमानने त्याच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला.आपल्या पोस्टमध्ये सलमानने मित्राच्या स्वभावाचे वर्णन करत तो अत्यंत दयाळू, मदत करणारा आणि नेहमी हसतमुख असणारा व्यक्ती होता, असे म्हटले आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी “सगळं ठीक होईल” असं तो नेहमी म्हणायचा, अशी आठवण त्याने पोस्टद्वारे शेअर केली.

सलमानने पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, त्याला रडावेसे वाटते, रागही येतो, पण तरीही तो एकही अश्रू ढाळू शकत नाहीत. फक्त आठवणी आणि त्याचे हास्य उरले असल्याचे त्यांनी लिहिले. त्याच्या या शब्दांमधून त्याच्या मनातील वेदना स्पष्टपणे जाणवतात.मित्राच्या आठवणींना उजाळा देताना सलमानने त्याच्याशी जणू संवाद साधत भावनिक आणि थोड्याफार विनोदी शैलीत निरोप दिला. त्याच्या या पोस्टने सोशल मीडियावर चाहत्यांना प्रचंड भावूक केले असून अनेकांनी श्रद्धांजली वाहत सहानुभूती व्यक्त केली आहे.


