Latest Marathi News
Ganesh J GIF

“पवार आणि ओबेरॉय कुटुंबातील स्नेहाचा नवा ‘अध्याय’; सुनेत्रा पवारांच्या विजयावर विवेकची खास प्रतिक्रिया”

दिवंगत उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या निधनानंतर बारामती येथे पुन्हा पोटनिवडणूक झाली. दादांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण 22 उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडली आणि जनतेने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विजयी केलं.एकूण 2.14 लाख मताधिक्याने त्यांना विजय मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांचा विजय झाल्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉन यानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत अभिनेत्याने नव्या अध्यायाची सुरुवात… असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासोबत फोटो पोस्ट करत विवेक म्हणाला, ‘सुनेत्रा पवार वहिनी… अजित पवार दादांना जनतेमध्ये उभारलेला वारचा आजही त्यात ताकदीने जिवंतत आहे. तर बारामती येथून मिळालं प्रेम त्याचं दुसरं प्रतिक ठरत आहे… हा ऐतिहासिक विजय राज्याच्या राजकारणातील अभिमानाता नवीन अध्याय लिहिणारा ठरत आहे… राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर आलेली जबाबदारी तुमच्या नेतृत्वक्षमतेची आणि जनतेच्या विश्वासाची मोठी पोचपावती आहे.’

‘दादांचं लोकांप्रती असलेलं प्रेम… त्यांची विकासकामं… प्रत्येक संकटांशी लढण्याची जिद्द… याच करणांमुळे अजित पवार ‘लोकनेते’ झाले. आज जनतेने त्यांच्या अर्धांदगिनीवर विश्वास दाखवला.. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा सन्मान केला… तुमच्यामध्ये त्या वारशाला पुढे नेण्याची ताकद आहे… तुम्हाला या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्रासाठी हा काळ नक्कीच सुवर्णकाळ ठरेल. कारण सूर्य दिसत नसला करी चंद्राच्या पाठीशी असतो…’ असं देखील विवेक याने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

सांगायचं झालं तर, ऐतिहासिक विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आभार मानले. पण कार्यकर्त्यांना कोणताही विजयोत्सव साजरा करण्यासाठी बंदी घातली. शिवाय रंग उधळण्यास, मिरवणुका काढून जल्लोष करण्यास देखील सुनेत्रा पवार यांनी नकार दिला… तर जनतेचं आभार व्यक्त करत सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘बारामतीच्या जनतेचं प्रेम आणि मतं ही अजित दादांना खरी आदरांजली आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानते.’

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!