
ग्वाल्हेरमध्ये हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी चार सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक केली.
हॉटेलच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, एटीएम कार्ड आणि बँक संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली.
तपासात पाकिस्तानी नंबरशी संपर्क आणि परदेशात पैसे पाठवल्याचे धक्कादायक कनेक्शन समोर आले.

मध्ये प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या पाकिस्तानी नेटवर्कचा पर्दाफाश केला. पोलिसांशी संशयावरुन शहरातील सिटी सेंटरमध्ये असलेल्या कैलास विहार या हाॅटेसवर छापा मारला ज्यात चार सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक करण्यात आली. हाॅटेलच्या रुममधून या एजंट्सद्वारे देशभर फसवणूक केली जात होती. फसवणूकीतून जमा केलेले पैसे बँक खात्यांमार्फत परदेशात पाठवले जात होते. अटक केलेले हे आरोपी मोरेना आणि धोलपूरचे रहिवासी असून त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
बुलडाण्यात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाने बालिकेला घरात बोलावले अन् नंतर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी हाॅटेल्च्या रुममधून सर्व नेटवर्क चालवत होते. त्यांनी हाॅटेल रुमला कंट्रोल रुममध्ये बदलले होते. पोलिसांनी तिथून लॅपटाॅप आणि अनेक मोबाईल फोन्स जप्त केले. या उपकरणांच्या मदतीनेच देशव्यापी फसवणूकीचे जाळे चालवले जात होते. आरोपी बऱ्याच काळापासून हाॅटेलमध्ये राहत होते.बऱ्याचकाळ हाॅटेलमध्ये थांबलेल्या या तरुणांची हालचाली संशयास्पद वाटत होत्या ज्यामुळे एसएसपी धर्मवीर सिंग यांनी खबरींनी याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावरच पोलिस पथकाने शिताफिने हाॅटेलवर छापा टाकला आणि सर्व तरुणांना आपल्या ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीमध्ये सर्वांनी आपला गुन्हा स्वीकारत ते सायबर फसवणूकीत सामील असल्याची कबुली दिली.

तपासात पाकिस्तान कनेक्शन उघड
पोलिसांच्या तपासादरम्यान हे उघड झाले की, हाॅटेल रुममध्ये सापडलेल्या मोबाईल फोन्सवर ९२ हून अधिक पाकिस्तानी कंट्री कोडद्वारे वारंवार व्हॉट्सॲप कॉल्स आणि मेसेजेस येत होते. इतकेच काय तर एका पाकिस्तानी नंबरवरुन आरोपींनी फसवणूकीतील रकमेची मागणी केली जायची ज्यानंतर लगेच फसवणुकीची रक्कम त्या नंबरवर ट्रान्सफर केली जायची.

