Latest Marathi News
Ganesh J GIF

एक्स गर्लफ्रेंडच्या प्रियकराचा लोखंडी रॉडने १३-१४ वार करून निर्घृण खून

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या नव्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची क्रूरपणे हत्या केली. एवढेच नाही तर त्याने तरुणीवरही प्राणघातक हल्ला केला असून ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी दिनेश महादेव झांबरे याला अटक केली आहे.

सात मजली PG मध्ये थरार, नेमकं काय घडलं?

सागर गायकवाड हा हिंजवडीतील एका सात मजली PG मध्ये गेल्या चार दिवसांपासून मॅनेजर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री निकिता शिवाजी दनाने ही तरुणी एका महिन्यासाठी येथे राहण्यासाठी आली. तिने सागर हा आपला प्रियकर असल्याचे सांगितल्यानंतर, सागरने तिला तिसऱ्या मजल्यावरील ३१० क्रमांकाची खोली दिली.

आरोपी थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचला

गुरुवारी दुपारी आरोपी दिनेश झांबरे पीजीमध्ये आला. निकिता ही माझी प्रेयसी असून मला सागरला भेटायचे आहे, असे त्याने सांगितले. सागर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे कळताच दिनेश थेट वर गेला.

१३ ते १४ वार अन् रक्ताचा सडा

काही वेळातच तिसऱ्या मजल्यावरून आरडाओरड ऐकू येऊ लागल्याने इतर कर्मचारी वर धावले. त्यावेळी सागर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि दिनेश त्याच्यावर लोखंडी रॉडने सपासप वार करत होता. आरोपीने मध्यस्थी करणाऱ्यांना बाजूला ढकलत निकितालाही बेदम मारहाण केली. या भीषण हल्ल्यात सागरवर १३ ते १४ वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

शालेय जीवनातील प्रेम अन् बीसीएचे शिक्षण…

प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार दिनेश आणि निकिता यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. दोघेही BCA चे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते.मात्र, पुण्यात आल्यानंतर निकिता आणि सागर यांच्यात जवळीक निर्माण होऊन प्रेमसंबंध सुरू झाले. याचाच राग मनात धरून दिनेशने हा प्लॅन आखला आणि सागरचा खून केला.

पोलिसांची तत्परता, आरोपी गजाआड

गंभीर जखमी झालेल्या निकितावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दिनेश झांबरे याला अटक केली. आरोपीवर हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील सखोल तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!