
राज्यभरातील कोट्यवधी महिला ज्या बातमीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होत्या, त्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत एक खूप मोठा अपडेट समोर आला आहे. जुलै महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. जुलै महिन्याचा हप्ता १५ ऑगस्टपूर्वीच थेट महिलांच्या बँक खात्यात वर्ग केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मंगळवारी होणार मोठा निर्णय; १,५०० की ३,००० मिळणार?

यापूर्वी जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता जुलैच्या हप्त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी मंजुरीचा महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

३,००० रुपये एकत्र मिळणार?
जर काही कारणास्तव १७ ऑगस्टपर्यंत जुलैचा हप्ता जमा झाला नाही, तर रक्षाबंधनाचे औचित्य साधून जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात, असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
धक्कादायक! e-KYC मुळे ८० लाख महिला ठरल्या अपात्र?
एकीकडे आनंदाची बातमी असतानाच दुसरीकडे एक मोठी चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यभरात राबवण्यात आलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या महिलांचा हप्ता थांबण्याची टांगती तलवार आहे. दुसऱ्या बाजूला, सर्व कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण झालेल्या राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.
‘या’ महिलांच्या खात्यातच जमा होणार १५०० रुपये!
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हवा असेल, तर खालील अटींची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची यशस्वीरीत्या पडताळणी झाली आहे. ज्या महिला शासनाने ठरवून दिलेल्या सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये बसतात.
महत्त्वाची सूचना
ज्या महिलांची ई-केवायसी अजूनही अपूर्ण आहे किंवा अर्जात त्रुटी आढळल्या आहेत, त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपले स्टेटस आणि e-KYC वेळेत तपासून घेणे गरजेचे आहे.

