Latest Marathi News
Ganesh J GIF

“कैलास पाटील माझे मित्र, त्यांनी जनतेच्या अपेक्षेचा विचार करावा”; ठाकरेंची साथ सोडणाऱ्या ओमराजेंची आमदाराला पक्षप्रवेशाची अप्रत्यक्ष साद!

ठाकरेंच्या शिवसेनेत झालेल्या दुुसऱ्या मोठ्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरेंच्या ६ खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींनंतर आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना एकनाथ शिंदेंच्या पक्षात येण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या साद घातली आहे.

“लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे गरजेचे” – ओमराजे निंबाळकर

खासदारांनंतर आता आमदारांचेही ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटात असलेल्या आमदार कैलास पाटील यांच्यासोबतच्या संबंधांवर वक्तव्य केले. ऑपरेशन टायगरबाबत मला माहिती नाही, पक्षात राहणे किंवा सोडणे हा कैलास पाटलांचा वैयक्तिक अधिकार आहे.

आमदार कैलास पाटील हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्यासोबतची मैत्री आजही कायम आहे. मी त्यांना कोणताही राजकीय सल्ला देणार नाही, पण ज्या लोकांसाठी आपण काम करतो, त्या मतदारांच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करणे लोकप्रतिनिधी म्हणून गरजेचे असते. आपण स्वतः मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच ठाकरेंची साथ सोडून सत्तेत सहभागी झाल्याचे स्पष्टीकरणही ओमराजेंनी पुन्हा एकदा दिले.

कैलास पाटलांची ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका

खासदार ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी धाराशिवचा दौरा केला होता. त्यावेळी आमदार कैलास पाटील यांनी संपूर्ण दौऱ्याचे नेतृत्व करत आपण कधीही उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता ओमराजेंच्या या सादेनंतर कैलास पाटील काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हीच इच्छा” – प्रताप सरनाईक

दुसरीकडे, महायुती आणि मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर बोलताना शिवसेना (शिंदे गट) नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचे विधान केले आहे:
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही सर्व शिवसैनिकांची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, राजकारणात संख्याबळाला महत्त्व असते. सध्या भाजपकडे जास्त आमदार असल्याने त्यांचा मुख्यमंत्री आहे.आगामी निवडणुकांमध्ये आमचे आमदार आणि खासदार जास्त निवडून आले, तर आम्ही नक्कीच मुख्यमंत्रीपदावर दावा करू असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!