Latest Marathi News
Ganesh J GIF

उत्साही वातावरणात दहिटणेच्या जि. प. शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा; शिक्षण प्रेमी विकास घडमोडे यांच्याकडून मुलांना स्टडी पॅडचे वाटप

स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्साह, देशभक्तीपर गीतांनी भारावून टाकलेले वातावरण आणि प्रभात फेरीतून अंगात संचारलेला उत्साह आणि चिमकुल्यांची निरागस देशभक्ती अश्या जोशपूर्ण वातावरणात दहिटणे ता. बार्शी येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव यांचे जन्मगाव असलेल्या दहिटणे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याबरोबरच शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने मुलांचे चेहरे आनंदाने खुलले होते.

एटीएस परीक्षेत यश संपादित केल्याबद्दल ओंकार हरिदास काशीद आणि मनस्वी महालिंग आंधळकर आणि स्कॉलरशीप परीक्षेत पात्र ठरलेले ओंकार काशीद, सार्थक चेट्टी, शुभांगी गावसाने यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमासाठी दोन एलईडी टीव्ही देण्याचे आश्वासन दिले.

शिक्षणप्रेमी विकास घडमोडे मागील हे अनेक वर्षांपासून मुलांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात. त्यांनी यावर्षी देखील त्यात सातत्य ठेवत मुलांना स्टडी पॅडचे वाटप केले. विकास घडमोडे हे त्यांचे वडील मल्लिकार्जुन घडमोडे आणि बंधू साईनाथ घडमोडे यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात. यापुढे देखील हा उपक्रम सुरू राहील, अशी माहिती विकास घडमोडे यांनी यावेळी दिली.

मुख्याध्यापिका सुवर्णा करंडे आणि सहशिक्षक सुहास भोसले यांचे नियोजन आणि शाळा शिक्षण समितीच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिकारी लक्ष्मण काशीद, चनबसप्पा चेट्टी, उद्योजक तात्या मारुती यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वरूप चेट्टी, सागर काशीद, जोतीराम सौंदळे, लक्ष्मीसागर काशीद, तुकाराम साठे, गणेश काशीद, नागनाथ चेट्टी, संजय गायकवाड, सोमनाथ आगलावे, हनुमंत काशीद, भुजंग कोळी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!