Latest Marathi News
Ganesh J GIF

रुपाली चाकणकरांची बदनामी भोवली!; दीपाली सय्यद ,सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरेंसह १९ जणांवर पुण्यात गुन्हा दाखल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकुणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेल्या अशोक खरात नावाच्या भोंदूबाबासोबतचे जुने फोटो वापरून अश्लील, बदनामीकारक पोस्ट आणि धमक्या दिल्याचा आरोप चाकणकरांनी तक्रारीत केला आहे. या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या प्रमुख व्यक्ती आणि पदाधिकारी

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांच्यासह इतर खात्यांचा समावेश आहे.

नक्की प्रकरण काय आहे?

अशोक एकनाथ खरात याला मार्च २०२६ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली. ९ वर्षांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमात झालेली ओळख आणि त्यावेळचे फोटो वापरून चाकणकर यांच्याविरोधात बदनामीकारक मोहीम चालवण्यात आल्याचा आरोप आहे. चाकणकर यांनी तक्रारीसोबत १९ फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टचे पुरावे आणि स्क्रीनशॉट पोलिसांना सोपवले होते. शिवाजीनगर पोलिसांनी चाकणकर यांच्या तक्रारीवरून भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान (IT Act) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!