Latest Marathi News
Ganesh J GIF

“काढ रे तो फोटो…”; पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबीरीशेजारील पंतप्रधान मोदींचा फोटो अमित ठाकरेंनी हटवला!

पुणे दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची पाहणी करताना एक मोठा वाद निर्माण झाला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबीरीशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे दिसताच अमित ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी तात्काळ तो फोटो हटवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला असून भाजपने यावर तीव्र शब्दांत पलटवार केला आहे.

नेमका काय घडला प्रकार?

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मनसेच्या विद्यार्थी शाखेचे उद्घाटन आणि कँटीनची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे आले होते. या वेळी महाविद्यालयातील प्रशासकीय कारभारावर आणि असुविधांवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाहणीदरम्यान वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आला. हे पाहताच “काढ रे तो फोटो…” असे आदेश त्यांनी सोबत असलेल्या मनसे कार्यकर्त्याला दिले. आदेश मिळताच कार्यकर्त्याने अवघ्या काही क्षणात पंतप्रधान मोदींचा फोटो भिंतीवरून खाली उतरवला.

अमित ठाकरेंचा प्रशासनाला सवाल

शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांचे फोटो लावण्याबाबत केंद्र आणि राज्य शासनाचे सुस्पष्ट नियम आहेत. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो कसा काय लावण्यात आला? असा सवाल उपस्थित करत अमित ठाकरे यांनी कॉलेज प्रशासनावर जोरदार आक्षेप नोंदवला.

भाजपचा अमित ठाकरेंवर पलटवार

अमित ठाकरे यांच्या या कृतीवर भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अशा प्रकारे फोटो काढून काहीही फरक पडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांच्या आणि कोट्यवधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. भिंतीवरून फोटो काढल्याने लोकांच्या मनातील त्यांचे स्थान कसे हिरावून घेणार? या घटनेनंतर आता मनसे आणि भाजपमध्ये राजकीय वाकयुद्ध रंगाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!