Latest Marathi News
Ganesh J GIF

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट!; ऑगस्टचा हप्ता ‘या’ दिवशी बँक खात्यात जमा होणार?

राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांतील महिलांसाठी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जुलै महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात आधीच जमा झाले आहेत, मात्र सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे हा हप्ता कधी जमा होणार, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे डोळे लागले आहेत.

गौरी आगमनाच्या मुहूर्तावर खात्यात जमा होणार पैसे?

समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, आगामी गणेशोत्सव आणि विशेषतः ‘गौरी आगमना’च्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता वर्ग करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. ऐन सणासुदीच्या काळात खात्यावर पैसे जमा झाल्यास महिलांना सण मोठ्या आनंदात साजरा करता येणार आहे. जरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी गौरी आगमनादरम्यान पैसे मिळतील असा प्रबळ अंदाज वर्तवला जात आहे.

निवडणुकीपूर्वीची मास्टरस्ट्रोक योजना

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५० वाहून १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा महायुती सरकारला निवडणुकीत मोठा राजकीय फायदा झाल्याचेही बोलले गेले होते.

इ-केवायसी (e-KYC) मुळे लाखो अपात्र महिला वगळल्या!

दरम्यान, योजना सुरू झाल्यानंतर अनेक अपात्र महिला आणि काही ठिकाणी पुरुषांनीही गैरफायदा घेत अर्ज भरल्याचे उघडकीस आले होते. या प्रकारांना चाप लावण्यासाठी सरकारने ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली. ई-केवायसीच्या प्रक्रियेनंतर लाखो बनावट आणि अपात्र अर्जदारांची नावे योजनेतून वगळण्यात आली असून आता केवळ खऱ्या आणि पात्र लाभार्थी महिलांनाच या योजनेचा थेट लाभ दिला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!