Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय!; १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला आहे! हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहणार असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ऑरेंज अलर्ट (Orange Alert): धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा घाट परिसर (जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता).

यलो अलर्ट (Yellow Alert): मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांसह एकूण २६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’.

मुख्य इशारा: मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.

१३ सप्टेंबर:

कोकण: बहुतांश ठिकाणी पाऊस; तुरळक ठिकाणी अतिमुसळधार, विजांचा कडकडाट आणि उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा.

मध्य महाराष्ट्र: बहुतांश ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस.

मराठवाडा: बहुतांश ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे.

विदर्भ: बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता.

१४ सप्टेंबर:

कोकण: बहुतांश ठिकाणी पाऊस आणि सोसाट्याचा वारा.

मध्य महाराष्ट्र व मराठवाडा: बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस.

विदर्भ: काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस.

१५ सप्टेंबर:

कोकण: बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी कायम.

मध्य महाराष्ट्र: बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता.

मराठवाडा व विदर्भ: काही ठिकाणी ते तुरळक स्वरूपाचा पाऊस.

हवामान खात्याच्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी, तसेच घाट परिसरात प्रवास करणाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!