
पुण्यातील हडपसर-साडेसतरानाळी परिसरात पुनावाला ग्रुपच्या खाजगी वाहनांवर लाल-निळे फ्लॅशर दिवे वापरल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमागे क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी केलेली तक्रार महत्त्वाची ठरली आहे अमोल तुपे यांनी 21 सप्टेंबर रोजी पुणे शहर पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांकडे पुराव्यांसह निवेदन सादर केले होते. खाजगी वाहनांवर पोलिसांच्या वाहनांप्रमाणे लाल-निळे फ्लॅशर दिवे वापरणे हा नियमांचा भंग असल्याचे सांगत संबंधित वाहनांवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली होती या तक्रारीची दखल घेत पुणे पोलिसांनी संबंधित वाहनांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने 28 सप्टेंबर रोजी आरटीओकडे अधिकृत परवानगीसाठी अर्ज केला आहे. याचा सरळ अर्थ झाले की अमोल तुपे यांचे आरोप खरे ठरले आता यावर आरटीओ आणि पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे हडपसरकरांचे लक्ष लागले आहे.



