Latest Marathi News
Ganesh J GIF

महिला पोलीस कर्मचाऱ्याला मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे पडले महागात, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई

मांजरी,पुणे – पुण्यात वर्दीमध्ये मद्यप्राशन करून गाडी चालवल्याच्या आरोपावरून महिला पोलीस कर्मचारी निलंबित झाली आहे. अश्विनी केकान यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई केली आहे. मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शेवाळवाडी फाटा नंदिनी टकले नगर कमानीजवळ रस्त्यावर मद्यप्राशन करून गाडी चालवल्याचा आरोप आहे. विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारणे आणि थेट फुटपाथवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. नंबर प्लेट नसलेल्या राखाडी रंगाच्या मारुती सुझुकी बलेनो गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवर चढवली.वाहनचालक आणि नागरिकांना शिवीगाळ केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय तपासणी अहवालात मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आलं आहे. २७ ऑक्टोबर रोजी पोलीस कर्मचारी रामेश्वर थोरात यांच्या तक्रारीवरून मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील ३९ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी अश्विनी केकान यांना निलंबित करण्यात आले आहे. मांजरी परिसरात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी पोलीस कर्मचारी रामेश्वर थोरात यांच्या तक्रारीवरून मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पोलीस कर्मचारी काळेपडळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. शेवाळवाडी येथील रामानंद हॉटेलसमोरील रस्त्यावर ती गणवेशात असताना मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचा आरोप आहे. तिने नंबर प्लेट नसलेली राखाडी रंगाची मारुती सुझुकी बलेनो कार रस्त्यावरून विरुद्ध दिशेने (रॉन्ग साईड) चालवली. समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारत तिने गाडी थेट फुटपाथवर चढवली. या धोकादायक प्रकारामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले होते. यानंतर तिने वाहनचालक आणि नागरिकांना शिवीगाळही केल्याचे समोर आले असून, या संपूर्ण घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला कर्मचारी गणवेशात दिसत असून, उपस्थित नागरिकांनी विचारणा केली असता तिने मद्यपान केल्याचे मान्य केल्याचेही ऐकू येते.

घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालात तिने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले असून, निलंबनाच्या आदेशातही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक सूत्रानुसार, संबंधित कर्मचारी या घटनेच्या आधी म्हणजेच रविवार आणि सोमवारी कर्तव्यावर नव्हती. ही घटना घडण्यापूर्वी ती पुण्यातील बंड गार्डन परिसरात मित्रमैत्रिणींसोबत पार्टीसाठी गेली होती का, यादृष्टीनेही तपास सुरू आहे. तिने नेमके कुठे आणि कधी मद्यप्राशन केले, याचा पोलीस शोध घेत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्याकडूनच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्हिडिओमधील दृश्ये, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मांजरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!