
….म्हणून मुस्लीम पतीने केली हिंदू पत्नीची हत्या
आरोपी पतीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या, हे कारण आले समोर
मुंबई दि २८(प्रतिनिधी) – बुरखा घालण्यास मनाई करणाऱ्या हिंदू पत्नीची भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पूर्व उपनगरात घडली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी पती विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे पोलीसांनी लव्ह जिहादचा मात्र इन्कार केला आहे.
रुपाली रमेश चंदनशिवे असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे असून इकबाल शेख असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपालीचा तीन वर्षापूर्वी तिचा प्रेमविवाह त्याच परिसरात राहणाऱ्या इकबाल शेख याच्यासोबत झाला होता. इकबाल शेख याचा पूर्वी एक विवाह झालेल्या असून त्याने पहिल्या पतीला सोडल्यानंतर रूपालीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत दुसरा विवाह केला होता. या दाम्पत्याला २ वर्षाचा एका मुलगा आहे, इकबालच्या कुटुंबीयांनी रुपालीचे नाव बदलून जारा असे ठेवले होते. इक्बाल व त्याचे आईवडिल हे रुपालीला मुस्लीम धर्माप्रमाणे पेहराव करण्यासाठी आणि मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे वागण्याकरीता दबाव टाकत होते. तसेच उर्दू आणि हिंदीमध्येच बोलण्यास सांगत होते. या कारणावरुन इक्बाल आणि जारामध्ये नेहमी भांडण होत होते. त्यामुळे ते वेगळेही झाले होते. घटस्थापनेच्या दिवशी इक्बाल तिला भेटण्यासाठी आला होता. यावेळी त्यांच्यात घटस्फोटासह मुलाचा ताबा देण्यावरून प्रचंड वाद झाला. या वादामुळे इक्बालने तिच्या गळ्यावर आणि हातावर तीक्ष्ण हत्याराने वार केले, त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये मुस्लीम धर्माच्या रीतीरिवाजावरून कोणताही वाद नव्हता. त्यामुळे या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चा रंग देऊ नये, तसेच अफवा पसरवून सामाजिक तणाव निर्माण करू नये, असे आवाहन टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील काळे यांनी केले आहे.