संतापलेल्या बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली
'या' मुळे बच्चू कडु संतापले,व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
अमरावती दि २८(प्रतिनिधी)- सरळमार्गी आंदोलन न करता अनोख्या मार्गाने आंदोलन करत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारा नेता म्हणून परिचित असलेल्या बच्चू कडू सध्या बदललेले दिसत आहेत. विकास कामांसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यावरच राग काढला आहे. कार्यकर्त्याने विकास कामाबद्दल जाब विचारल्याचा राग आल्याने आपल्या सर्कल प्रमुखाच्या कानशिलात लगावली. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदार संघातील गणोजा येथील सर्कल प्रमुख पदावर काम करणारे सौरभ इंगोले यांनी विकास काम ठरवून दिल्याप्रमाणे झाली नसल्याची तक्रार बच्चू कडू यांच्याकडे केली. यावेळी बच्चू कडू यांनी त्याला “तुला काय समजत”, असे विचारत त्या कार्यकर्त्याच्या कानाखाली लगावली. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. विकासकामांचा जाब विचारत अधिकाऱ्यांवर हात उगारणारे बच्चू कडु यांनी कार्यकर्त्यांवरच हात उगारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. सौरभ इंगोले हा अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांच्यासोबत प्रहारमध्ये काम करत आहे. त्याची पत्नी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आहे.बच्चू कडु बदलले असल्याची चर्चा रंगली आहे.
अपक्ष म्हणून निवडून आलेले बच्चू कडू यांनी सुरूवातीला उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता.पण शिंदेच्या बंडाला त्यांनी साथ दिली होती. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद भेटेल अशी त्यांना आशा होती.पण त्यांना काहीच न भेटल्याने त्यांची अस्वस्थता सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पण या घटनेमुळे कार्यकर्ते दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.