Just another WordPress site

‘संतोष बांगर तुझा बाप आहे’ म्हणत बांगर समर्थकाची शिवसेनेच्या अयोध्या पाैळला धमकी

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन करत दिला धीर, दोन्ही आॅडिओ क्लिप व्हायरल

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांना आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे.या घटनेनंतर उद्धव ठाकरेनी फोन करत पाैळला धीर दिला आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांची काळजी घेण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे. दोन्ही आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी आमदार बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला होता. आता त्यांच्या एका कार्यकर्त्यांने युवासेनेच्या अयोध्या पाैळला फोनवर धमकी देत शिविगाळ केली आहे. यावर अश्लील शब्द देखील वापरण्यात आले आहेत. यावेळी त्या कार्यकर्त्याने पाैळला हिंगोलीत येण्याचे आव्हान दिले. तसेच तिथ आल्यावर कपडे फाडत चपलांचा हार घालण्याची धमकी दिली आहे. बांगर तुझे बाप आहेत म्हणून पाैळ यांना शिविगाळ करण्यात आली आहे.यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करत पाैळ यांची चाैकशी केली आहे.तिला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. अतिधाडस करु नकोस, मला रणरागिणीला गमवायचं नाहीये असा काळजीचे आवाहन केले आहे.

GIF Advt

 

उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये हा समर्थक अयोध्या पोळ यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचं ऐकू येत आहे. त्यानंतर शिवसैनिकांन कडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!