ठाकरे कि शिंदे कोणासोबत मिलिंद नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले
मिलिंद नार्वेकर कोणाचे या चर्चेवर पडदा, बघा नेमकी काय घेतली भूमिका
मुंबई दि ३(प्रतिनिधी) – गेल्या ३० वर्षांपासून उद्धव ठाकरे यांची सावली बनून वावरणाऱ्या मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशा वावड्या गेल्या चार दिवसांपासून
उठल्या होत्या. शिंदे गटातील महत्वाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केल्यामुळे शक्यता बळावली होती. पण नार्वेकर यांनी अप्रत्यक्षपणे आपण कोणासोबत आहोत हे स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू, निकटवर्तीय किंबहुना शिवसेनेचे संकटमोचक अशी ज्यांची ख्याती आहे त्या मिलिंद नार्वेकर यांच्या गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हालचालींविषयी बरीच चर्चा झाली. साधे गटप्रमुख होण्याची इच्छा असलेले नार्वेकर हे ठाकरेंजवळ जाण्याचे हुकुमी एक्के होते. पण ठाकरे संकटात असताना नार्वेकरांनी साथ सोडणे अनेकांना पटत नव्हते. कारण त्यांनी मध्यंतरी फडणवीसांची घेतलली भेट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नार्वेकरांच्या घरी गणपती दर्शनाला येणे, खासदार श्रीकांत शिंदे यांची विधान भवनात घेतलेली भेट यामुळे ते शिंदे गटात जाणार असा कयास काढण्यात आला होता. पण या सगळ्या चर्चांवर आता मिलिंद नार्वेकर यांनी पडदा टाकला आहे. त्यांनी शिवतीर्थावर जाऊन ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला तर महत्वाच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली आहे. त्यातून त्यांनी आपण ठाकरेंना सोडून कुठेही जात नसल्याचं स्पष्ट केले आहे. पण यस खुलाशामुळे शिंदे गट मात्र तोंडघशी पडला आहे.
मिलिंद नार्वेकर साधे शिवसैनिक होते. नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने नार्वेकर मातोश्रीवर पोहोचले. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे? असे विचारल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. आणि काही दिवसात नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले.उद्धव ठाकरे बाळासाहेबांसारखे चोवीस तास लोकांत रमणारे नेते नाहीत. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी नार्वेकर हेच एकमेव अँक्सेस आहेत.