Latest Marathi News

लग्नाला अवघे तीन महिने होताच पुजाने घेतला असा निर्णय

पोलीसांच्या तपासात धक्कादायक कारण समोर,बघा नक्की कारण काय...

बुलढाणा दि ३(प्रतिनिधी)-चिखलीच्या संभाजीनगरात पुजा अक्षय गायकवाड या १९ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली होती.माहेरकडच्यांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. पण आता एक धक्कादायक कारण समोर आले आहे.

पुजाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीतुन तिच्या नवऱ्यासह सासू ,सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता अक्षयचे बाहेरच एका ठिकाणी अनैतिक संबंध होते त्यामुळेच तो पत्नीला त्रास देत होता असे सत्य समोर आले आहे.पुजाने लग्न झाल्यानंतर तिने तीन महिन्यातच आत्महत्या केली. लग्नाआधी सासरच्या लोकांनी दहा गोळ्याची मागणी केली होती.पण नंतर पाच तोळ्यात सर्व ठरले होते. पण सासरचे दहा तोळ्याची मागणी करत तिला त्रास देत होते.तर पुजानेही नवरा अक्षयचे कुठेतरी अनैतिक संबंध असल्याने तो मला वारंवार मारहाण करतो अशी तक्रार केली होती. तर घटनेच्या दिवशी पुजाने भावाला फोन करत नवरा, सासू,सासरा ,दिर आज सकाळपासून प्रचंड त्रास देत आहेत, तू घर सोडून निघून जा,तुला मी कायमची संपवेन अशी धमकी देत असल्याचे सांगितले होते. पण नंतर आत्महत्या केल्याची बातमी त्यांना सांगण्यात आली.

या संपूर्ण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. पुजाच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माहेरच्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.पण महिला अत्याचारात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!