Latest Marathi News
Ganesh J GIF

महाविकासआघाडीचे सरकार कोसळण्यावरून अजित पवारांच मोठ विधान

मुंबई प्रतिनिधी – शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली.महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही, याची हमी देत त्यांनी आमदारांना दिलासा दिला असल्याचे समजते.

“या बैठकीनंतर छगन भुजबळ म्हणाले की,” शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे बाहेर आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक बोलवून गटनेता नेमला असावा. शिवसेनेने गटनेता बदलला असला, तरी सरकारला काहीही धोका नाही. शिवसेनेचा अंतर्गत विषय असून एकनाथ शिंदे यांची मनधरणी होईल. तसेच सरकार अडीच- अडीच वर्षे असेल, असे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत ठरले नसल्याची माझी माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेचा हा अंतर्गत विषय असून त्यावर बोलणे योग्य नाही. शिवसेनेचे नेतेच त्यांचा प्रश्न सोडवतील. सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. हे सरकार अल्प मतात येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीत असून ते मुंबईत आल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल, असे पाटील म्हणाले

 

 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!