
केरळ दि ६(प्रतिनिधी)- केरळमधून भीषण बस अपघाताची बातमी समोर येत आहे.केरमध्ये आज सकाळी दोन बसमध्ये जोरदार धडक झाली. या भंयकर अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल ४० जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. ही स्कूलबस होती.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहेत. मृतामध्ये विद्यार्थी जास्त आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी इथे दोन वेगवान बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. बस एर्नाकुलममधील मुलंथुरुथी येथील बसेलियस शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. पण पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी इथे केएसआरटीसीच्या बसला धडकली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. यात पाच विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. केरळचे मंत्री एमबी राजेश यांनी याबाबत पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, जखमींना उपचारासाठी जवळच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. सर्व जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर घटनास्थळी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.