Just another WordPress site

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे भाषण सुरु असताना अनेक खुर्च्या रिकाम्या

रिकाम्या खुर्च्याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, शिंदे गटाचा मेळावा फ्लाॅप?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बीकेसीत पार पडला ठाकरे कुटुंबातील सदस्यांना स्टेजवर आणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.मात्र त्यांचे भाषण अपेक्षेपेक्षा जास्त कांबळे. त्यामुळे सभेसाठी जमलेला जमाव हळूहळू सभास्थळावरुन काढता पाय घेतला. याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आपल्या दीड तासाच्या भाषणात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांच्या हिंदूत्त्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. राज्यभरातून आलेल्या लाखो शिवसैनिकांसमोर प्रारंभीच नतमस्तक होत शिंदे यांनी अभिवादन केले. ही गर्दी आपल्या भूमिकेला राज्यभरातून मिळत असलेल्या पाठिंब्याचे द्योतक असून खरी शिवसेना कुठे आहे आणि कुणाबरोबर आहे, याचे उत्तरच आज जनतेने दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र मात्र मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण फारच लांबलं. त्यामुळे शिंदेंचं भाषण सुरु होतं त्यावेळी त्यांचे भाषण सुरु असताना अनेक समर्थक खुर्चांवरुन उठून निघून जाताना दिसत होते. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच लोक निघून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दुसरीकडे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी ४५ मिनिटाचे भाषण केले.

GIF Advt

मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या भाषणातील मुद्दे बऱ्याच वेळा खाली कागदावर बघून वाचून दाखवत होते. तसेच ते अनेकवेळा घड्याळाकडेही पाहत होते. दहा वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येत नाही या नियमामुळेच त्यांनी अनेकदा वेळ तपासून पाहीली. पण लांबलेले भाषण पाहून अनेकांनी काढता पाय घेतला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!