बाहेरचे पदार्थ आवडतात का? मग हा व्हिडिओ बघाच
इडलीवाल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, इडलीसाठी वापरतो 'इथले' पाणी
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळा असा सल्ला आपले डाॅक्टर आपल्याला वारंवार देत असतात पण ब-याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण आम्ही आता तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहोत की तुम्ही बाहेरची गोष्ट खाताना दहादा विचार कराल कारण सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे.
मुंबईतल्या एका रेल्वे स्थानकाबाहेर इडली वडा विकणाऱ्या फेरीवाल्याचा हा व्हिडिओ आहे. हा इडलीवाला इडली वड्याच्या चटणीत टाकण्यासाठी चक्क रेल्वे स्थानकाजवळच्या शौचालयातून पाणी आणत असल्याचे दिसत आहे. कहर म्हणजे ग्राहकांना पिण्यासाठी देखील तो हेच पाणी देत होता. व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक इडलीवाला सार्वजनिक शौचालयातील नळातून आपल्या कॅनमध्ये पाणी भरत आहे. हे शौचालय अतिशय खराब आहे. इडलीवाला ते कॅन घेऊन पुन्हा आपल्या गाड्याजवळ येतो. आणि आणलेले पाणी इडली वड्याच्या चटणीसाठी वापरतो. व्हिडिओत काही लोक त्याच्या गाड्यावरील इडली-वडा खात असताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
कोरोना काळात नागरिक आपल्या आरोग्याप्रती जागरुक झाले होते. पण कोरोना गायब झाल्यानंतर लोक पुन्हा एकदा बेफिकीर झाले आहेत. हा इडलीवाला सरळसरळ नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेरचे पदार्थ खाताना काळजी घेण्याची गरज आहे.