Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाले ‘हे’ चिन्ह

निवडणुकीच्या रिंगणात ठाकरेंच्या मशालीला शिंदे 'हे चिन्ह' घेऊन आव्हान देणार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणुक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला ‘ढाल- तलवार’ हे चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले होते. मात्र त्यांनी दिलेली चिन्ह नाकारली होती आज नव्याने तीन चिन्ह दिल्यानंतर ढाल – तलवार हे चिन्ह वापरण्यास शिंदे गटाला परवानगी दिली आहे.

निवडणूक आयोगाने काल शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं, मात्र उगवात सूर्य, त्रिशुळ आणि गदा ही पर्यायी चिन्हं निवडणूक आयोगाने नाकारली होती. धार्मिक चिन्ह असल्याचे कारण आयोगाने दिले होते. त्यामुळे शिंदे गटाने तळपता सुर्य, ढाल- तलावार, पिंपळाच झाडं हे चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवले ज्यातील ढाल- तलावार हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. शिंदे गटाने हे चिन्ह मिळाल्यानंतर परफेक्ट चिन्ह म्हणत चिन्हाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर आमचे चिन्ह घराघरात पोहोचले असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात मशाल विरूद्ध धाल तलवार यांच्यातील राजकीय द्वंद पहायला मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळाल आहे. तर आता शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना’, हे नाव शिंदे गटाला मिळालं आहे.तर चिन्ह म्हणून ढाल-तलवार मिळाले आहे. आगामी काळात एकनाथ शिंदे गट शिंदे गट ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!