Latest Marathi News
Ganesh J GIF

अमृता फडणवीसांचे प्रसिद्ध गायकासोबतचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

अमृता फडणवीसांचा गाण्यात रोमँटिक अंदाज, हे गाणे एकदा बघाच

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय मतांशिवाय आपल्या गाण्यामुळेही त्या चर्चेत येत असतात. आता त्या पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांचे एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यात त्या रोमँटिक मूडमध्ये बाॅलीवूडमधील नामवंत गायकासोबत गाणे गाताना दिसल्या आहेत.

अमृता फडणवीसांनी आजवर अल्बम गाणी गायली आहेत.पण आता त्यांचे येत असलेले गाणे एका चित्रपटातील आहे. ‘लव्ह यू लोकतंत्र’ या चित्रपटातील‘धडका दिल’ हे गाणे त्यांनी गायले आहे. हे गाणे त्यांनी बॉलिवूड प्रसिद्ध गायक शानसह गायले आहे. अमृता फडणवीसांचं हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात त्या रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. नव्या गाण्याबाबत अमृता फडणवीसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. येत्या १४ ऑक्टोबरला ‘लव्ह यू लोकतंत्र’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस त्यांच्या गाण्याला येणाऱ्या कमेंटमुळेही चर्चेत असतात.

अमृता फडणवीसांनी ‘लव्ह यू लोकतंत्र’ चित्रपटातील ‘ना जाने क्यू धडका दिल’ हे या वर्षातील सगळ्यात रोमॅंटिक गाणं लोकप्रिय गायक शान यांच्यासह गाताना मजा आली” असे आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!