Just another WordPress site

अंधेरीत ऋतुजा लटके ठाकरे की शिंदे गटाच्या उमेदवार?

अंधेरी पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट, ऋतुजा लटके म्हणाल्या...

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक नाट्यमय वळणावर आली आहे. या निवडणूकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करायला दोन दिवस राहिले असताना मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यामागे एकनाथ शिंदे असल्याची चर्चा आहे. लटके यांना शिंदे गटात येण्याची आॅफर देण्यात आली आहे. शिवाय मंत्रिमंडळात महत्वाचे मंत्रिपद देखील देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. शिवाय लटके आणि एकनाथ शिंदे यांची गुप्त भेटीत हे ठरल्याचे सांगण्यात आले होते. पण लटके यांनी सर्व चर्चेचा इन्कार करत “आमची निष्ठा उद्धव साहेबांसोबत आहे. माझे पती रमेश लटकेंची निष्ठा उद्धव साहेब आणि बाळासाहेबांसोबत होती. मी निवडणूक लढणार ती मशाल या चिन्हावरच, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. तर राजीनामा मंजूर न झाल्यास न्यायालयात जाण्याचीही तयारी ठाकरे गटाने केली आहे. शिवाय राजीनामा मंजूर न झाल्यास ठाकरे गटाने बॅकअप प्लॅन तयार करुन ठेवला आहे.

GIF Advt

भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अंधेरीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेमार्फत लटकेंवर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या वादानंतर पुन्हा एकदा ठाकरे विरूद्ध महापालिका आमनेसामने येणार आहेत. किंवा अंधेरीत शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!