Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीचे धक्कादायक कृत्य

सीसीटीव्ही व्हायरल,पत्नीच्या मित्रासोबत पतीने जे केले ते भयंकरच

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिल्याची खळबळजनक घटना पिंपरी- चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेत त्या मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेमुळं पिंपरी- चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पंकज शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर सथ संशय घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी पत्नीला आपण गावाला जात असल्याचे सांगितले पण तो पत्नीवर पाळत ठेऊन होता. पण त्याचवेळी पंकजच्या पत्नीला तिचा मित्र निलेश जोर्वेकर भेटायला आला. पंकजची पत्नी आणि मयत निलेश हे दोघे अत्यंत जवळचे मित्र होते. निलेश आणि पंकजची पत्नी हे दोघे त्यांच्या घरात गेले, त्या पाठोपाठ काही मिनिटांनी तिथं पंकज देखील पोहचला. त्याने पुन्हा संशय घेत निलेश समोरच पत्नी बरोबर भांडण सुरु केले. याच रागातून पंकजने धारदार शस्त्राने निलेशला भोसकले. त्यानंतर पंकजने निलेशला घराच्या दहा मजल्यावरून थेट खाली ढकलून दिल. यात, निलेशचा मृत्यू झाला. यावेळेचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलीसांच्या हाती लागले आहेत.

या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पंकज शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. पण चारित्र्याच्या संशयावरून घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!