
भाजपा आणि एकनाथ शिंदेनी केला प्रताप सरनाईकांचा करेक्ट कार्यक्रम
सरनाईकांच्या कारवाईमागे एकनाथ शिंदेंचा हात, सरनाईकांना ईडीची पीडा
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ११ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. शिंदे गटात जात भाजपाशी हातमिळवणी करूनही ईडीने ही कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पण एकनाथ शिंदे आणि भाजपानेच सरनाईक यांचा गेम केल्याची चर्चा आहे.
प्रताप सरनाईक यांच्यावर NSEL घोटाळ्याप्रकरणी ठाण्यातील दोन फ्लॅटस आणि मीरा रोडवरील एक फ्लॅट जप्त केल्याची चर्चा आहे. यापूर्वी या प्रॉपर्टीवर तात्पुरती कारवाई झाली होती. आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झालाय आणि त्यामुळेच ईडी संपत्ती जप्त केल्याचे बोलले जात आहे. पण या कारवाई मागे स्वतः एकनाथ शिंदे आणि भाजप असल्याची चर्चा आहे. सरनाईक ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपाने शिंदेकडे हा मतदारसंघ भाजपासाठी सोडण्याची मागणी केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यात मोठा वाद झाला होता. सरनाईक यांनी मतदारसंघ सोडण्यास नकार दिल्यामुळेच ईडीने ही कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी कोणा कोणाचा गेम होणार हे पहावे लागणार आहे.
केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला सरनाईकांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यानंतर शिंदे गटाच्या बंडात सरनाईकही सामील झाले होते. तरीही सरनाईकांना ईडीनं दणका दिल्यामुळे ईडीची कारवाई आणखी कशी होणार हे पहावे लागेल.