Latest Marathi News
Ganesh J GIF

मृत प्रेयसीच्या मृतदेहाला मंगळसूत्र घालत केले लग्न

प्रियकराच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल, प्रेमाचा क्षण पाहून व्हाल भावूक

आसाम दि २३(प्रतिनिधी)- आसाममधून एक विचित्र घटना समोर आली आहे. आजच्या काळात प्रेम केवळ शारिरिक आकर्षण ठरत असताना आसाममधील प्रियकराने आपल्या प्रेयसीला दिलेले वचन पूर्ण करत मृत प्रेयसीला मंगळसूत्र घालते. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मोरीगाव येथील बिटुपन तामुली आणि चापरमुख येथील कोसुआ गावात राहणारी प्रार्थना बोरा दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांच्या प्रेमाबद्दल घरासह सर्व गावाला माहिती होती. मात्र, प्रार्थना काही दिवसांपूर्वी आजारी पडली होती. उपचारासाठी तिला गुवाहाटीमधील एका दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्देवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रार्थनाच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबासह बिटुपनला सुद्धा मोठा धक्का बसला. प्रार्थनाचं पार्थिव घरी आणल्यानंतर बिटुपनने तिच्या घरी जात आपली प्रेयसी प्रार्थनाच्या गळ्यात हार घातला तर दुसरा हार स्वत:च्या गळ्यात घातला. त्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालत कपाळात सिंदुर भरून तिच्याशी लग्न केले. एवढेच नाहीतर आयुष्यभर अविवाहित राहण्याचीही शपथ घेतली. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असुन अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्यांचे भन्नाट किस्से हे सतत समोर येत असतात. पण आसामधील तरुणाने आपल्या प्रेयसीवरील प्रेमाखातर आणि दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी जे केले ते पाहून सगळेच भावूक झाले आहेत. आजच्या तरुणाईला ख-या प्रेमाची आठवण करुन दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!