Latest Marathi News

प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबरोबर तो व्हिडिओ व्हायरल

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, तर अभिनेत्री म्हणते ते माझ्यासाठी सुंदर क्षण

मुंबई दि २३(प्रतिनिधी) – दृश्यम २’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या श्रीया सरनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रीयाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. पण यावर तिने स्पष्टीकरण देखील दिले आहे.

अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री श्रीया सरन हिने साकारली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात श्रीयाला तिच्या पतीसह एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होते. यावेळी श्रीयाने पापराझींसमोर फोटोसोठी पोझ देताना पतीला किस केले होते . तिचा हा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये श्रीया तिचा पती आंद्रेई कोस्विचला किस करताना दिसत आहे. श्रीयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण तिच्या या कृतीवर नेटकरी नाखुश झाले आहेत. पती-पत्नी किस करताता, संपूर्ण जगाला माहीत आहे. कॅमेरासमोर असं करण्याची काय गरज आहे? असा सुर नेटक-यांनी तिला ट्रोल करताना व्यक्त केला होता. पण श्रीयाने यावेळी ‘माझ्या खास क्षणी मला किस करणं माझ्या पतीला नॉर्मल वाटतं आणि ते सुंदर आहे, असं मला वाटतं. अशा नॅचरल गोष्टींवरून का ट्रोल केलं जातं हेच आंद्रेईला कळत नाही,” असे उत्तर तिने दिले आहे.

श्रिया कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने इष्टम या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले होते. तसंच साऊथसह तिने दृश्यम या ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. त्याचा सिक्वेल देखील जोरदार हिट ठरला आहे. श्रीया चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. श्रीया तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत असते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!