Just another WordPress site

धक्कादायक! चक्क शाळेतच मुख्यध्यापकाची दारु पार्टी

मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, वर्गालाच बनवले बार

अमरावती दि २३(प्रतिनिधी)- अमरावती जिल्ह्यामध्ये एका शिक्षकाने आपल्या शिक्षकी परसाला काळिमा फासत शिक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घडलेल्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्या शिक्षकाचा प्रताप समोर आणणारा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे समोर आले आहे. शाळेतील वर्ग खोलीतच मुख्याध्यापक दारू पिऊन झोपला होता. मेळघाटातील काटकुंभ येथील जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.कहर म्हणजे या शिक्षकाने तिथेच लघुशंकाही केली.त्यानंतर दारू पिऊन तो वर्ग खोलीत झोपला. या मद्यधुंद मुख्याध्यापकाचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. अविनाश राजनकर असं दारुड्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. शिक्षकाचे स्थान हे समाजात आदर्श असते. शिक्षकाला आदर्श मानले जाते. मात्र, त्याला काळीमा पाडण्याचे काम मुख्यध्यापकाने केले आहे. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

GIF Advt

एकीकडे दिवसेंदिवस मराठी शाळांची अवस्था वाईट होत असताना जे उरलंय त्या ठिकाणीसुद्धा असा गलिच्छ प्रकार घडल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्याध्यापकच दारू पिऊन शाळेत आल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. जिल्हा परिषद सीईओंनी कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!