
खुदावाडी ग्रामपंचायत निवडणुकीत काका पुतण्यात कांटे की टक्कर..
पुतण्याने काकाविरोधात थोपटले दंड, अटितटीच्या लढतीकडे गावाचे लक्ष
तुळजापूर दि ११ ( सतीश राठोड ) :- राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नाही किंवा कोण कोणाचा कायमस्वरूपी शत्रूही नसतो असे म्हणतात तसेच कोणत्या वेळी कोण कोणाच्या विरुद्ध निवडणूक लढवील हेही सांगता येत नाही याचा प्रत्यय खुदावाडी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मध्ये दिसून येतो
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामपंचायतीची होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून जय हनुमान ग्रामविकास पॅनल कडून सावंत धनु पवार निवडणूक लढवीत आहेत तर त्यांच्या विरोधात संत गाडगेबाबा ग्राम विकास पॅनल कडून त्यांचे सखे पुतणे अनिल फुलचंद पवार हे निवडणूक लढवीत आहेत एकंदरीत प्रभाग क्रमांक चार मध्ये सख्या काका पुतण्यामध्ये कांटो की टक्कर अशी लढत होत आहे या अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे निवडणूक निकालानंतरच पाहावयास मिळणार आहे .
खुदावाडी ग्रामपंचायतीची ही निवडणूक दोन पॅनल मध्ये सरळ सरळ निवडणूक लागली आहे . संत गाडगेबाबा ग्रामविकास पॅनल व जय हनुमान ग्राम विकास पॅनलचे पॅनल प्रमुखाने आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत . या दोन्ही पॅनलच्या पॅनल प्रमुखाने मतदारांना आपलंसं करून घेण्यासाठी घर भेटीवर भर दिला आहे .एकंदरीत या निवडणुकीत काका पुतण्याच्या लढतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.