Just another WordPress site

इशान किशनच्या द्विशतकी खेळीवर त्याची गर्लफ्रेंड खुश

फोटो सोबत या इमोजीत आपल्या भावना व्यक्त करत उडवली खळबळ

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने एकदिवसीय सामन्यात ठोकलेल्या धडाकेबाज द्विशतकाते संपूर्ण क्रिकेट जगतात काैतुक होत आहे.यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडने दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा होत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी करत केवळ १२६ चेंडूत द्विशतक झळकावले. आपल्या खेळीत इशानने १३१ चेंडूत २१० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २४ चौकार आणि १० षटकारांचा समावेश द्विशतकी खेळी करणारा किशन सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, आणि रोहित धर्मानंतर चाैथा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या खेळीमुळे भारताचे बांग्लादेशचा २२७ धावांनी पराभव केला. त्याच्या या कामगिरीने त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडीया खुश झाली आहे. आदितीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. अदितीने इशान किशनचा एक फोटो शेअर करताना त्यावर हार्ट आणि इमोशनल झाल्याचे इमोजी लावले आहेत तर आणखी एक फोटो शेअर केला आहे यात तो टीम इंडियाच्या जर्सित द्विशतक झळकावल्यानंतर बॅट उंचावताना दिसत आहे. यावेळी इशान किशनने काही विक्रम देखील स्वतः च्या नावावर केले आहेत. आता तो जगातील सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज ठरला आहे.

GIF Advt

इशान किशनची गर्लफ्रेड अदिती हुंडिया पेशाने एक मॉडेल आहे. तसेच ती सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.तसेच ती मिस दिवा सुपरानॅशनल २०१८ ची विजेती राहिलेली आहे. शिवाय तिने फेमिना मिस इंडिया आणि मिस राजस्थान स्पर्धेतदेखील सहभाग घेतला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!