Latest Marathi News

ध्यास कोचिंग क्लासचा ‘आनंद बाजार’ उत्साहात साजरा

तब्बल २५ स्टॉल्समधून विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गुणांचे प्रदर्शन

बार्शी दि ११(प्रतिनिधी)- ध्यास कोचिंग क्लासेसचा ‘आनंद बाजार’ उत्साहात पार पडला. किराणा, भाजीपाला, फूड कॉर्नर, उपयोगी वस्तू, ज्वेलरी आणि अन्य विविध प्रकारच्या 25 स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक गुणांचे प्रदर्शन केले. पालकांनी व परिसरातील नागरिकांनी आनंद बाजारमध्ये खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.

ध्यास कोचिंग क्लासच्या आनंद बाजारचे उदघाटन श्री करियर अकॅडमी चे संचालक श्री. उदय शिंदे सर यांनी केले. यावेळी संचालक सचिन मस्के, पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. आनंद बाजार उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष होते.विद्यार्थांचे किराणा माल, ज्वेलरी, मेकअप साहित्य, संसार उपयोगी वस्तू, भाजीपाला, खाद्य पदार्थ असे एकूण 25 स्टॉल्स होते. पालक, आजी-माजी विद्यार्थी, सुभाषनगर परिसरातील नागरिकांनी तसेच ओन्ली समाजसेवा ग्रुप, हेल्थ ग्रुप, वृक्ष संवर्धन समिती, महाराष्ट्र अकॅडमी, लिटल स्टार प्रो-ऍक्टिव्ह ऍबकस क्लासेस यांनी देखील उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला पोलीस जाणीव संघ यांचे विशेष सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान यावे, व्यवसायाची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. ध्यास कोचिंग क्लासचा विद्यार्थी समाजातील कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये, यासाठी क्लासमध्ये वारंवार नवीन उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या आनंद बाजारचे आयोजन करण्यात आले असल्याचे संचालक प्रा. सचिन मस्के यांनी सांगितले.

‘नाविन्यपूर्ण कृतिशील उपक्रम वारंवार राबावणारा हा क्लास राज्यतील एकमेव क्लास आहे. सर्व भेट दिलेल्या मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच क्लासच्या संचालकांचे देखील कौतुक केले. आपला पाल्य ध्यास कोचिंग क्लासचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो, असे पालकांनी सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!