
या तरुणीने तरुणाशी नाही तर ‘यांच्यासोबत’ बांधली लग्नगाठ
तरुणीच्या लग्नाची होतेय जोरदार चर्चा,आधुनिक मीराचा व्हिडिओ व्हायरल
जयपूर दि २०(प्रतिनिधी)- राजस्थान येथील एका तरुणी आजच्या युगातील मीरा बनली आहे कारण या तरूणीने थेट देवाबरोबरच लग्न केलं आहे. पूजा सिंह असं या तरुणीचे नाव असून तिने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या या अनोख्या लग्नाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.
पूजा सिंह हि उच्चशिक्षीत असून, तिने राज्यशास्त्रात एमए केले आहे. पूजाला आयुष्यभर अविवाहित राहायचं नव्हतं. शिवाय तिला लग्नानंतर येणा-या काही तडजोडीही नको होत्या म्हणून तिने राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील गोविंदगडजवळील नरसिंहपुरा गावातील मंदिरात भगवान श्रीकृष्णाशी विवाह केला. सामान्य हिंदू विवाहसोहळ्यांप्रमाणेच सर्व विधी करून, अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पूर्ण झाला. पूजाच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते, त्यामुळे ते या लग्नाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र तिच्या आईने तिच्या निर्णयाला पाठिंबा देत मुलीचे लग्न थाटामाटात लावून दिले. पूजा म्हणाली “समाजात महिलांची स्थिती अत्यंत वाईट आहे. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये भांडणे, घटस्फोट हे आता सामान्य झाले आहे. मला वाटतं समाजात लग्न हे पूर्वीसारखे पवित्र नाते राहिलेले नाही. शिवाय, लग्नानंतर स्त्रियांची अवस्था अधिकच दयनीय होते म्हणून आपण देवाबरोबर विवाह केला आहे.”
आपला जोडीदार कसा असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते यासाठी आईवडीलही आग्रही असतात पण पुजाने समाजाचा आणि वडिलांच्या विरोधात जाऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न केलं. आता तर या लग्नाची देशभरात चर्चा होते आहे. पूजा ही भगवान विष्णूची भक्त असल्याने तिने आता त्यांना पती म्हणून स्विकारले आहे.