
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला
शिंदे गटाच्या नेत्याने केली तारखेची घोषणा, संधी कोणाला याचे दिले संकेत
मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत येऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्यामध्ये ऒक्त कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याचे वारंवार सांगितले जात होते, पण आता शिंदे गटाच्या नेत्याने मंत्रिमंडळात विस्ताराची तारीख जाहीर करुन टाकली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रीपदाची आस असणाऱ्या आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आॅगस्टमध्ये पार पडला होता. त्यानंतर दुस-या मंत्रिमंडळा विस्ताराच्या फक्त संभाव्य तारखा जाहीर होत होत्या. पण आता शिंदे गटातील नेते आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जाहीर केल्याने लवकर विस्तार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, “येत्या २० ते २२ जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत तांत्रिक अडचणी दूर होतील. त्यानंतर २० ते २२ तारखेदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो”, असे शिरसाट म्हणाले आहेत. यानंतर इच्छुक आमदारांनी मंत्रिपदासाठी लाँबिंग सुरु केले आहे. शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक असुन समतोल साधण्याचे आव्हान एकनाथ शिंदेसमोर असणार आहे.
आपल्याला मंत्रिपद मिळावं म्हणून अनेकजण प्रयत्नशील आहेत. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नव्हता. पण यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराची तारीखही ठरली आहे. पण दोन्ही बाजूंनी कोणाला संधी मिळणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. अमित शहांकडुन संभाव्य मंत्र्यांच्या यादीला मान्यता मिळाली असून कोणाला संधी मिळणार हे पहावे लागणार आहे.