Latest Marathi News
Ganesh J GIF

आगीमुळे बाल्कनीत अडकलेली मुलगी जिवंत जळाली

आगीचा व्हिडिओ व्हायरल, मुलगी बचावासाठी ओरडत राहिली पण...

अहमदाबाद दि ७(प्रतिनिधी)- अहमदाबादच्या शाहीबाग भागातील ११ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी आग लागली. या अपघातात एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ती बाल्कनीत अडकली होती आणि आपला जीव वाचवण्यासाठी लोकांकडे विनवणी करत होती, पण तिला वाचवता आले नाही. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद फायर ब्रिगेडला सकाळी शाहीबाग येथील गिरधरनगर सर्कलजवळ असलेल्या ऑर्किड ग्रीन फ्लॅटच्या सातव्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये पाच जण होते. चौघे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. तर १५ वर्षीय प्राची खोलीत अडकली आणि नंतर बाल्कनीच्या दिशेने गेली. यादरम्यान ती खिडकीजवळ आली आणि तीने मला वाचवा वाचवा अशी विनंती करत होती..आग कशामुळे लागली हे देखील स्पष्ट झालेले नाही. काही लोक वरच्या मजल्यावर अडकले होते. दरम्यान, या भीषण आगीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सातव्या मजल्यावरील गॅलरीत एक व्यक्ती आगीत अडकलेले दिसत होती. दरम्यान अनेकांना वाचविण्यात यश आले आहे.

अग्निशमन दलाचे एक पथक ८ व्या मजल्यावर पोहोचले. तिथून दोरी बांधून दोन जण त्या बाल्कनीत पोहोचले. त्यांनी मुलीला बाहेर काढलं. यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती पुर्ण भाजली होती. यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!