
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा फेमस रिल्स स्टार सोबत हुक डान्स*
डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री ट्रोल
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे मूड बना लिया हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले, रिलीज झाल्यापासून हे गाणे खूप व्हायरल. या गाण्यात अमृता वेगवेगळ्या लोकेशन्सवर डान्स करताना दिसत आहे. आता त्यांनी एका टिकटाॅक स्टार सोबत डान्स केला आहे.
रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तसेच हे गाणे पाहण्यासाठीदेखील सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या नव्या व्हिडीओवर अनेक युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. अमृता फडणवीस यांनी मेने मुड बना लिया गाण्याच्या हूकस्टेपवर रील बनवण्याचे चॅलेंज यूझर्सना दिले होते. ते आव्हान पूर्ण केल्याने त्यांनी सोशल मीडिया स्टार रियाझ अलीसोबतही या गाण्याच्या हूकस्टेपवर रील बनवली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते. मूड बना लिया हे गाणं यूट्युबवर चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. या गाण्याला आतापर्यंत ४.६ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान हेच का तुमचे हिंदुत्व असा सवाल विचारत नेटक-यांनी फडणवीसांना ट्रोल केले आहे.
अमृता फडणवीस यांची याआधी देखील बरीच गाणी प्रदर्शित झाली आहेत. बँकर असलेल्या अमृता यांना गायनाची आवड आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्या कायम आपली आवड जोपासताना दिसतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या गाण्यांची चर्चा कायम रंगलेली असते. अनेकदा त्यांना त्यांच्या आवडीमुळे ट्रोल देखील करण्यात आले आहे.