
धक्कादायक! आरोग्य मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात मृत्यू
आरोग्यमंत्र्यांची दिवसाढवळ्या हत्या, गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल, तणावाची स्थिती
भुवनेश्वर दि २९(प्रतिनिधी)- ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ हल्ला झाला आहे. गांधी चौकाजवळ सुरक्षा रक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यातच त्यांचे निधन झाले.
नबी दास एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दास त्यांच्या कारमधून बाहेर आले तेव्हा एएसआयने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचे कारण समोर आलेले नाही. यानंतर तातडीने नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे. दास यांच्यावर ४ ते ५ वेळा फायरिंग करण्यात आली आहे. ओडिशाच्या कॅबिनेट मंत्र्यावर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव गोपाल दास असे असून तो गांधी चौकात ASI म्हणून तैनात होता. गोपाल दासला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
नाबा किशोर दास हे ओडिशातील झारसुखडा जिल्ह्यातील महत्वाचे नेते आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री होते. त्यांच्या निधनाने शोक आणि चिंता व्यक्त करण्यात येत आहे.