भारताच्या क्रिकेटपटूची नशेच्या अवस्थेत पत्नीला मारहाण
मारहाणीचा गुन्हा दाखल,जामिनावर बाहेर असलेल्या खेळाडूच अडचणीत
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मद्यप्राशन करून विनोद कांबळीकडून मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप त्याची पत्नी अँड्रियाने केला आहे. यासंदर्भात त्याच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे विनोद कांबळी अडचणीत आला आहे.
वांद्रे पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विनोद कांबळीविरोधात भारतीय दंडविधानातील कलम ३२४, ५०४ या अंतर्गत गुन्हा दाखल केला. विनोद कांबळीने कुकिंग पॅन फेकून मारल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला. यावेळी अँड्रियाच्या डोक्याला जखम झाली. दारुच्या नशेत कांबळीने हे कृत्य केल्याचा दावा केला जातो. त्यानंतर हे प्रकरण मिटल्याचेही कांबळीच्या पत्नीने सांगितले. पत्नीला मारहाण करताना घटनास्थळी त्यांचा १२ वर्षीय मुलगा उपस्थित होता. त्याने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र रागाच्या भरात कांबळीने त्याच्या पत्नीच्या अंगावर कुकिंग पॅन फेकून मारला. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यामुळे वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात विनोद कांबळी यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे कि याबाबतीत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहेत. काही दिवसांपूर्वी तो दारू पिऊन गाडी चालवल्यामुळेही चर्चेत आला होता.
काही दिवसाआधी विनोद कांबळी यांनी स्वतः एका मुलाखतीत म्हणणे कि माझ्याकडे कोणतेही काम नाही आणि मी फक्त बीसीसीआयच्या पेन्शनवर जगत आहे अशी व्यथा मांडली होती. त्यावेळी त्याला अनेक ठिकाणाहून जाॅबची आॅफर देण्यात आली होती. दरम्यान कांबळीवर ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे.