प्रपोज मारणाऱ्या तरुणाची तरूणीने केली जोरदार धुलाई
तरूणाच्या फजितीचा व्हिडिओ व्हायरल, प्रेमवीरांनो विचार करून प्रपोज करा
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- आज प्रेमाचा दिवस आहे. अनेक प्रेमवीर प्रेमिकेला प्रपोज करण्याचे मनसुबे रचत असतात. पण आज समोर आलेला एक व्हिडिओ पाहून प्रेमवीर टेंन्शनमध्ये आले आहेत. कारण एका मुलीला प्रपोज करणाऱ्या रोमिओची त्या मुलीने चांगलीच धुलाई केली आहे. या धुलाईचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हॅलेंटाईन वीक सुरु असून प्रेमीयुगुलांचा आनंद परपोच्च आनंदात आहेत. आज आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. पण एका तरुणाने व्हॅलेंटाईन डे आधीच एका मुलीला वर्गातच लाल गुलाब घेऊन प्रपोज केला. पण त्या मुलीने तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. हा संपूर्ण प्रकार वर्गातील विद्यार्थ्यांनी कॅमेरात कैद केला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मुलाने प्रपोज केल्यावर मुलीने नकार दिला. त्यामुळे तरुणाने गुलाबाचे फुल तरूणीच्या अंगावर फेकून दिले. त्यामुळे संतापलेल्या तरूणीने मुलाची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.
Proposal Reject kalesh 😓 pic.twitter.com/oPNTLb48DZ
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 5, 2023
घर के कलश नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्याने १ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.पण प्रेमवीर प्रपोज करण्यापूर्वी हजारदा विचार करतील.