रस्ता खोदल्याने गावगुंडाची एका कुटुंबाला बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, गुन्हा दाखल
पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिवली गावात गाव गुंडांनी कदम कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येण्या-जाण्याचा रस्त्यावरुन हा प्रकार घडला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नितेश अनंता आडकर, रामभाऊ नारायण आडकर, देविदास बबन आडकर, तानाजी रामभाऊ आडकर, संगीता अनंता आडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मावळ तालुक्यातील शिवली गावात कदम कुटुंबीय अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून अनेक दिवसांचा वाद आहे. यावरून कदम यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. या तक्रारीचा राग आडकर यांच्या मनात होता. त्यात येण्या-जाण्याचा रस्ता खोदल्याने आडकर कुटुंबियांनी कदम कुटूंबियांना हत्यार आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
सविता सुरेश कदम यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या मारहाणीत कदम कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.