
ठाकरे गटाच्या आमदार मुलाचा गायक सोनू निगमवर हल्ला
मारहाण घटनेचा व्हिडिओ व्हायरल, आमदार मुलाविरोधात गुन्हा दाखल
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- प्रसिद्ध गायक सोनू निगम याला हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. स्टेजवरच सोनू निगम याला धक्काबुक्की करण्यात आली. मुंबईतील चेंबूर परिसरात एका ईव्हेंटमध्ये हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ठाकरे गटाच्या आमदार पुत्राने ही मारहाण केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चेंबूरमध्ये एक संगीत कार्यक्रमाचा लाईव्ह कॉन्सर्ट होता. यावेळी सोनू निगम आणि त्याच्या सहकाऱ्यावर राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातर्पेकर यांचा सोनू निगमच्या अंगरक्षकांशी सेल्फी घेण्यावरून वाद झाला. त्याची गर्दीत सोनू निगमच्या अंगरक्षसोबत किरकोळ धक्काबुकीं झाल्यानंतर स्वप्नील यांनी देखील एका अंगरक्षकाला धक्का दिला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोनूची प्रकृती ठीक आहे.
या हल्ल्यात सोनूच्या शिक्षकाचा मुलगा रब्बानी खान जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.
Uddhav Thackeray faction group MLA’s son attacked Sonu Nigam. Sonu Nigam is currently in hospital with few injuries pic.twitter.com/dwyDb6eJKG
— Sanatani Rudra (@visionMP_) February 20, 2023
या प्रकरणी पोलिसांनी स्वप्निल फातर्पेकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती झोन ६ चे डीसीपी हेमराज सिंग राजपूत यांनी दिली. दरम्यान सोनू परफॉर्म करत असताना सोनूची टीम मॅनेजर सायरासोबतही गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.