पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर येथे सोमवारी श्रमध्यरात्री भाजी मंडईमध्ये भीषण आग लागली. यामध्ये जवळपास ९० स्टॉल्स आणि भाजीपाला जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
हडपसरमधील हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथील भाजी मंडईमधे आग लागली. यामध्ये जवळपास ९० स्टॉल आणि सर्व भाजीपालासह इतर साहित्य जळून खाक झाले असून दोन टेम्पोंचे मोठे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आगीचा व्हिडिओही समोर आला असुन त्यातून आगीची भीषणता दिसून आली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुण्यात आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. वानवडी भागात महावितरणच्या रोहित्राला आग लागल्याची घटना सोमवारी घडली होती. त्याशिवाय काही दिवसापुर्वी टिळक रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या शाखेत देखील आग लागल्याची घटना घडली होती.