अश्लील संभाषण करणाऱ्या मुख्यध्यापकाला महिलेने चोपले
चप्पल आणि काठीने झोडपून काढल्याचा व्हिडिओ व्हायरल, बघा नेमके काय घडले
चंद्रपूर दि १०(प्रतिनिधी)- दारूच्या नशेत महिलेशी अश्लील संभाषण करणाऱ्या मुख्याध्यापकाला महिलेने चांगलाच चोप दिला आहे. चपलेसोबत काठीने देखील त्या महिलेने मुख्यध्यापकाला चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलं झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील ताडाळा गावात ही घटना घडली आहे. मुख्यध्यापकाने धुलीवंदनाच्या दिवशी पीडित महिलेला फोन केला आणि तिला गाठून एका महिलेला अश्लील शब्दात शिवीगाळ करत होता. त्यामुळे संतापलेल्या महिलेने रोडवरच त्या मुख्यध्यापकाला गाठत आधी चपलने आणि नंतर काठीने झोडपून काढले.यावेळी तिथे मोठी गर्दी जमली होती. तिथे उपस्थित असलेल्या एकाने या प्रकरणाचा व्हिडिओ काढला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या या व्यक्तीच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षण विभाग काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.
शिक्षकाकडे समाज सन्मानाने बघतो. आई-वडिलांनंतर सर्वात जास्त आदर हा शिक्षकाला दिला जातो. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीकडे समाजात कसे वागावे हे सांगणे अपेक्षित असतो तोच वर्ग आज अश्लील वर्तन करत असल्याचे समोर आले आहे.