भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाला भाजपाचा विरोध
युती असल्याची करुन दिली आठवण, निर्णय न घेतल्यास युती तुटणार, शिंदे अडचणीत
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्के बसत आहेत. त्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करतांना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडाळीनंतर प्रमाण जास्तच वाढला आहे. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भुषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण त्यामुळे भाजपा नाराज झाली आहे.
भूषण शिंदे यांच्या प्रवेशाला भाजपने विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ज्याला सामाजिक जाणीव तसेच कडीचीही किंमत नसतांना त्यांना प्रवेश देऊ नसे गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष जाधव यांनी म्हटले आहे. ते म्हणाले “सामाजिक क्षेत्रात कवडीचीही किंमत नसलेले चिरंजीव भूषण सुभाष देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हे अतिशय वेदनादायक आहे. कारण ज्या माणसानं कधीही सामाजिक बांधिलकी जपली नाही, सामाजिक क्षेत्रात एक इंचाचंही काम नाही, फक्त भ्रष्टाचाराने हात बरबटलेले व्यक्तिमत्व अशी ज्यांची ओळख आहे, अशा व्यक्तीला शिवसेना शिंदे गटानं प्रवेश दिला. यावर गोरेगावकरांच्या तीव्र भावना आहेत. आमचा याला विरोध असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती आहे. त्यामुळे एका मित्राने केलेली एक चूक दोन्ही पक्षांना महागात पडू शकते असेही जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान सुभाष देसाई यांचा गोरेगाव मतदारसंघावर प्रभाव आहे. त्यामुळे आता, भाजपने भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केल्याने महापालिका निवडणुकीत काय परिणाम होईल, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांनी बघितलं स्वप्न होतं. ते विचार सध्या शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जात आहेत. त्यामुळेच मी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. असं भुषण देसाई यांनी म्हटलं आहे. पण यामुळे दोन पक्षात मात्र तणाव वाढला आहे. यामुळे वादाची शक्यता आहे.