पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला?
राष्ट्रवादीकडून ‘भावी खासदाराची’ बॅनरबाजी, काँग्रेस व राष्ट्रवादीत संघर्षाची शक्यता
पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्याचे खासदार असलेले भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची निवडणुक होणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोण उमेदवार देणार या नावांची जोरदार चर्चा आहे. युतीत ही जागा भाजपाकडे आहे पण महाविकास आघाडीत मात्र वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघ युतीत भाजपाकडे आहे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपा गिरिश बापट यांच्या सुन स्वरदा बापट यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. बापट घराशिवाय भाजपाने या ठिकाणी उमेदवारी दिल्यास काँग्रेस रवींद्र धंगेकर यांना तिकिट देण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांचे पुण्यनगरीचे भावी खासदार म्हणून होर्डिंग लागले आहेत.यावरुन आता पुन्हा राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीत सगळे आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपचे जगदीश मुळीक यांचे बॅनर लागले होते तेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण आता राष्ट्रवादीकडूनच असे बॅनर लावण्यात आलेले आहेत. दरम्यान काँग्रेसने पुणे लोकसभेची पोटनिवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. पण राष्ट्रवादीने या जागेवर अप्रत्यक्षपणे दावा केल्याने यावरुन आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच संघर्ष होण्याची शक्यता दिसत आहे.
भाजपकडून दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांची नावं चर्चेत आहेत. पण राष्ट्रवादीचे एंट्रीने या लढतीत रंगत येणार आहे.