येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार?
भाजपाच्या पक्षांतर्गत अहवालात धक्कादायक खुलासा, महाराष्ट्रात काय स्थिती?
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- देशात आगामी काळात २०२४ मध्ये लोकसभेसह अनेक निवडणुका पार पडणार आहे. पण आगामी होणाऱ्या निवडणूकीत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने केंद्रीय नेतृत्वाला दिल्याचे सांगितलं जात आहे. या अहवालामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार असा अहवाल समोर आला आहे. विनोद तावडे यांच्या समितीने हा अहवाल दिला आहे. २०१९ च्या तुलनेत आगामी निवडणुकीच्या काळात भाजपच्या जागा घटणार असून भाजपला महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकात देखील धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. पण त्यात आता घट होणार असल्याचे तावडे समितीने म्हटलेले आहे. नविन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीचे जास्तीत जास्त २२ ते २५ खासदारच निवडून येण्याचा कयास तावडे समितीने बांधला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात भाजप व त्यांच्या मित्रपक्षाच्या मदतीचे सरकार आहे. बिहारमध्ये मात्र यांनी भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार स्थापन केले आहे. या तीनही राज्यात भाजपचे संख्याबळ घटणार असल्याचे खुद्द पक्षाने नेमलेल्या समितीने म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठी तसेच देशातील राजकीय परिस्थितीचा अभ्य़ास हा मुख्य उद्देश असलेल्या या त्रिसदस्यीय समितीचे विनोद तावडे अध्यक्ष होते. देशभरातील भाजपची राजकीय ताकद आजमावून पाहणे आणि त्यादृष्टीने लोकसभेसाठी तयारी करणे यासाठी सुद्धा अभ्यास केला गेला.
दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार, असा अहवाल समोर आला असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण देत या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. उलट पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे, असं स्पष्टीकरण ट्विटद्वारे विनोद तावडे यांनी दिले आहे.